“मला वाटतं माझं लेखन,मला जे हवंय, ते देऊ शकतं आणि माझ्या लेखनातून,मला जे हवंय,ते होऊ शकतं.” एका सेमिनारमधे माझी आणि महेंद्र नाडकर्णीची भेट झाली.महेंद्र उत्तम लेखक आहेत हे मला पूर्वीच माहित होतं. पण ह्या सेमिनारमधे मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं.पन्नाशीत आलेले,सहाजीकच स्थुलतेकडे थोडे झुकलेले,डोक्यावरचे केस विरळ होण्याच्या मार्गाला लागलेले,छुटकुल्या उंचीचे,चेहर्यावर मिस्कील हास्याची लकीर भासवणारे महेंद्र नाडकर्णी [...]