-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नागपूर, ता. १३ - वातानुकूलित गाडीतील अव्यवस्थेमुळे झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाकरिता तक्रारकर्त्या प्रवाशाला पाच हजार द्यावे, असा दंड जिल्हा ग्राहक मंचाने दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक आणि मध्य रेल्वेच्या अतिरिक्त विभागीय व्यवस्थापकाला ठोठावला आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नागपूर, ता. १३ - आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र २५ टक्के आरक्षण द्यावे; अन्यथा आम्ही मायावतींना पाठिंबा देऊ, असा इशारा मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी आमदार विनायकराव मेटे यांनी महालस्थित गांधीगेट येथे आयोजित जनजागरण रथयात्रेत दिला.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नागपूर, ता. ८ - ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून नाना प्रकारच्या क्लृप्त्या लढविल्या जातात. सणासुदीच्या काळात जसा आकर्षक "डिस्काउंट' आणि "सेल'चा भडिमार होतो त्याचप्रमाणे नवीन वर्ष जवळ आले की, कॅलेंडर भेट देण्याचा प्रकार हल्ली खूप वाढला आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नागपूर, ता. १३ - तीन किलो सोने, दोन लाखांची रोकड आणि हिरेजडित दागिने असा लाखोंचा ऐवज लंपास करून, घरमालकासोबतच पोलिसांचीही झोप उडवून देणाऱ्या चोरट्याचा छडा लावण्यात सदर पोलिसांनी यश मिळविले.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नागपूर, ता. १३ - वर्णव्यवस्थेकडून चटके सहन केलेला दलित चित्रकार. परिस्थितीवर मात करीत नावारूपाला येत असताना त्याच्यावर प्रेम करणारी सवर्ण युवती. अचानक त्याच प्रेयसीमुळे अपघाताने त्याला अपंगत्व येते.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नागपूर, ता. १३ - अनेक वर्षांपासून नागपुरात वास्तव्याला असलेल्या बांगलादेशी महिला-पुरुषांना पोलिसांनी आज अटक केली. यामध्ये दोन मुले, तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. त्यांना सायंकाळी कारागृहात पाठविण्यात आले.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
अमरावती, ता. १३ - दर्यापुरात बंडू महाराजाच्या लीला, गणेशनगरात शिक्षकाकडून युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न व विनयभंग; तर आज एका अकरा वर्षीय बालिकेच्या विनयभंगाच्या घटनेने जिल्ह्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
नागपूर, ता. ११ - "सत्यम'मधील घोटाळा ही मर्यादित स्वरूपाची घटना असली तरी त्यानिमित्ताने नियंत्रण प्रणालीतील त्रुटींचा आढावा घेतला जात आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
नागपूर, ता. ११ - प्रलंबित मागण्या व शासकीय निमशासकीय आरोग्य सेवेतील औषध निर्मात्यांच्या अडीअडचणींबाबत नुकतीच औषध निर्माता संघटनेसोबत मंत्रालयाच्या दालनात आरोग्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी चर्चा केली.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
नागपूर, ता. ११ - कामगार कायद्यांत आमूलाग्र बदल घडवून "हायर ऍण्ड फायर'चे धोरण राबविण्याची मागणी उद्योगांकडून होत असली तरी ते सध्या तरी शक्य नाही.