-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
मेष - मनोबल उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. संततिसौख्य लाभेल.
वृषभ - स्वास्थ्य व समाधान लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
मिथुन - प्रवास सुखकर होतील. नातेवाइकांचे सहकार्य. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.
कर्क - महत्त्वाची आर्थिक कामे होतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो.
सिंह - आरोग्य उत्तम राहील. आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावू शकाल.
कन्या - आध्यात्मिक प्रगती होईल. महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी जाणवण्याची शक्यता.
तूळ - आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील.
वृश्चिक - प्रसन्नता लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. कामे यशस्वी होतील.
धनू - काहींना भाग्यकारक अनुभव येतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मकर - महत्त्वाची कामे शक्यतो आज नकोत. प्रवासामध्ये काळजी घ्यावी.
कुंभ - प्रकृती उत्तम राहील. समाधान लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मीन - कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. हितशत्रूंवर मात कराल.
- प्रा. रमणलाल शहा
-
Posted: January 11th, 2009, 12:00am CST
साप्ताहिक भविष्य
-
Fetched: January 8th, 2009, 2:59pm CST
मेष - कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत.
वृषभ - महत्त्वाची कामे दुपारपूवीं करावीत. दुपारनंतर अचानक धनलाभ संभवतो.
मिथुन - दुपारनंतर उत्साह विशेष असणार आहे. महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत.
कर्क - महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. मानसिक अस्वस्थता राहील.
सिंह - गुंतवणुकीची, प्रॉपर्टीसंबंधित कामे दुपारपूर्वी करावीत. स्वास्थ्य लाभेल.
कन्या - मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. मनोबलाच्या जोरावर कामे यशस्वी कराल.
तूळ - दुपारनंतर मानसिक चिंता संपून मनोबल वाढेल. दुपारपूर्वी आर्थिक लाभ होतील.
वृश्चिक - दैनंदिन कामे दुपारपूर्वी करावीत. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
धनू - खर्च कमी होतील. आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मकर - महत्त्वाचे निर्णय दुपारपूर्वी घ्यावेत. आर्थिक लाभ होतील.
कुंभ - महत्त्वाची आर्थिक कामे दुपारनंतर करावीत. अपेक्षित गाठीभेटी पडतील.
मीन - दुपारनंतरचा दिवस अधिक चांगला आहे. प्रॉपर्टीची कामे यशस्वी होतील.
- प्रा. रमणलाल शहा
-
Fetched: January 8th, 2009, 2:12am CST
साप्ताहिक भविष्य
-
Fetched: January 8th, 2009, 2:12am CST
मेष - आर्थिक कामे यशस्वी होतील. उसनवारी वसूल होईल. व्यवहार यशस्वी होतील.
वृषभ - दिवस अनुकूल आहे. प्रवासाचे योग येतील. मनोबल उत्तम.
मिथुन - महत्त्वाची कामे नकोत. अध्यात्मिक प्रगती. प्रवासाचे बेत पुढे ढकला.
कर्क - बौद्धिक परिवर्तन .वचारांना दिशा सापडेल. शैक्षणिक क्षेत्रात दिवस अनुकूल.
सिंह - कार्यक्षमता सिद्ध होईल. जिद्दीने अडचणींवर मात कराल. आकांक्षापूर्ती होईल.
कन्या - अडचणी कमी होतील. कामे मार्गी लागतील. भाग्यकारक घटना घडेल.
तूळ - प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाल. वादविवाद टाळा. सहकार्याची अपेक्षा करू नका.
वृश्चिक - कामे यशस्वी होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रसन्नता लाभेल.
धनू - मनोरंजनाकडे कल राहील. खर्च संभवतात. कामाचा ताण जाणवेल.
मकर - मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभ राहील. मुलांची प्रगती होईल.
कुंभ - भाग्यकारक घटना घडेल. समाधान लाभेल. कामे मार्गी लावाल.
मीन - मनोबल चांगले राहील. नातेवाईकांचा सल्ल्या घ्याल. विचारांना दिशा सापडेल.
- प्रा. रमणलाल शहा
-
Posted: December 14th, 2008, 12:00am CST
साप्ताहिक राशिभविष्य - श्रीराम भट
-
Posted: December 12th, 2008, 12:00am CST
आजचा वाढदिवस - नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
मेष - महत्त्वाची बातमी समजेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल.
वृषभ - जिद्द व चिकाटी वाढणार आहे. अपेक्षित असलेली प्रगती साध्य करू शकाल.
मिथुन - महत्त्वाची कामे शक्यतो टाळावीत. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
कर्क - प्रवास सुखकर होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींना विविध लाभ होतील.
सिंह - नोकरीत उत्तम स्थिती राहील. व्यवसायात वाढ करू शकाल. मानसिक प्रसन्नता.
कन्या - एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनेक बाबतींत अनुकूलता लाभेल.
तूळ - कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. शक्यतो वादविवादात सहभाग टाळावा.
वृश्चिक - वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदारीतील मतभेद कमी करू शकाल.
धनू - आरोग्य उत्तम राहील. कामाचा ताण जाणवेल. अतिरिक्त श्रम करावे लागतील.
मकर - निर्णय योग्य ठरतील. महत्त्वाच्या कामांचे नियोजन कराल. प्रवास सुखकर होतील.
कुंभ - सार्वजनिक क्षेत्रात विशेष प्रभाव राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
मीन - मनोबल उत्तम राहील. तुमच्या कामाबद्दलच्या महत्त्वाकांक्षा वाढणार आहेत.
- प्रा. रमणलाल शहा
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
आजचा वाढदिवस - सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
मेष - आर्थिक लाभ वाढेल. दिवस आर्थिकदृष्ट्या अनुकूल आहे. काहींना धनलाभ संभवतो.
वृषभ - अस्वस्थता कमी होईल. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
मिथुन - मनोबल कमी राहील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्च वाढणार आहेत.
कर्क - अनेकांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. मनोबल उत्तम राहील.
सिंह - व्यवसायात उत्तम स्थिती. नोकरीमध्ये इतरांवर प्रभाव. अस्वस्थता कमी होईल.
कन्या - अनेक बाबतींत अनुकूलता. मनोबल वाढविणारी घटना. आरोग्य उत्तम राहील.
तूळ - प्रवासामध्ये काळजी हवी. वाहने सावकाश चालवा. आर्थिक लाभ समाधानकारक.
वृश्चिक - आरोग्य उत्तम राहील. कार्यक्षमता वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनू - कर्मचारी वर्गाचे सहकार्य. हितशत्रूंवर मात कराल. मानसिक अस्वस्थता.
मकर - मनोबल उत्तम राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींना विविध लाभ.
कुंभ - आरोग्य उत्तम राहणार आहे. प्रवासाचे योग. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.
मीन - नातेवाइकांचे सहकार्य. जिद्द व चिकाटी वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील.
- प्रा. रमणलाल शहा
-
Posted: December 7th, 2008, 12:00am CST
साप्ताहिक भविष्य - श्रीराम भट
-
Posted: December 6th, 2008, 12:00am CST
आजचा वाढदिवस - कलेच्या क्षेत्रात यश.
मेष - प्रवासाचे योग येतील. आर्थिक लाभ समाधानकारक राहील. नवीन परिचय होतील.
वृषभ - नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान. प्रवास सुखकर.
मिथुन - नातेवाईक भेटतील. काहींच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता. प्रवास सुखकर होतील.
कर्क - प्रवास आज नकोत. वाहने चालवताना दक्षता हवी. वैवाहिक जीवनात मतभेद.
सिंह - वैवाहिक सौख्य. आनंददायी घटना घडेल. आर्थिक लाभ समाधानकारक.
कन्या - मनोबल कमी राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. विरोधकांवर मात कराल.
तूळ - संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभ समाधानकारक राहील. प्रवास सुखकर होतील.
वृश्चिक - प्रवासाचे योग येतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. इतरांवर प्रभाव राहील.
धनू - तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. नवा मार्ग दिसेल. एखादी महत्त्वाची घटना घडेल.
मकर - आर्थिक लाभ समाधानकारक. वैवाहिक सौख्य. प्रभाव वाढेल.
कुंभ - महत्त्वाची कामे करण्यास चांगला. वैवाहिक सौख्य. आनंदी राहणार आहात.
मीन - कौटुंबिक जीवनात मतभेद. कामात अडचणी. प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत.
- प्रा. रमणलाल शहा
-
Posted: November 2nd, 2008, 12:00am CDT
वास्तव विस्तवासारखे होणार!
ता. ४ नोव्हेंबर २००८ रोजी शनी-हर्षल प्रतियुती होत आहे. आगामी वर्षभराच्या कालखंडात या मंदगती ग्रहांची एकमेकांसमोर मोठी आव्हानात्मक स्थिती राहणार आहे. असे योग शतकांच्या कालावधीने होत असतात. शनी या ग्रहाची या जगतावर विलक्षण पकड आहे. किंबहुना ती मानावीच लागते. जगातील वास्तव खऱ्या अर्थाने शनीशीच निगडित असते.
-
Posted: November 1st, 2008, 12:00am CDT
मेष - मानसिक अस्वस्थता. महत्त्वाची कामे टाळावीत. आर्थिक लाभ समाधानकारक.
वृषभ - आरोग्य उत्तम राहील. प्रसन्नता लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.
मिथुन - आरोग्य उत्तम. विरोधक व हितशत्रूंवर मात कराल. अतिरिक्त कामाचा ताण व दगदग जाणवेल.
कर्क - संततिसौख्य लाभेल. मुलामुलींसाठी वेळ देऊ शकाल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.
सिंह - गुंतवणुकीची कामे यशस्वी होतील. प्रवास सुखकर होतील. नोकरीमध्ये उत्तम स्थिती राहील.
कन्या - जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. कार्यक्षेत्र वाढणार आहे. भाग्यकारक घटना घडेल.
तूळ - आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस विशेष अनुकूल आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृश्चिक - दिवस अनेक दृष्टीने अनुकूल. कामांत सुुयश लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल.
धनू - काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मकर - मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.
कुंभ - आरोग्य उत्तम राहील. तुम्ही अधिकाधिक महत्त्वाकांक्षी बनाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मीन - अनुकूलता लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य. झालेल्या चुकीबद्दल तुम्हाला पश्चात्ताप होईल.
- प्रा. रमणलाल शहा
-
Posted: October 26th, 2008, 12:00am CDT
वार्षिक भविष्य - श्रीराम भट
-
Posted: October 11th, 2008, 12:00am CDT
मेष - नवीन परिचय होतील. मित्रमैत्रिणी भेटतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.
वृषभ - प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढेल. आनंदी व आशावादी राहाल.
मिथुन - प्रवास सुखकर होतील. दैनंदिन कामे यशस्वी होतील. तुम्हाला नवा मार्ग दिसेल.
कर्क - महत्त्वाची कामे आज नकोत. मानसिक अस्वस्थता राहील. काहींना एखादा मनस्ताप संभवतो.
सिंह - मनोबल वाढेल. प्रकृती उत्तम राहील. उत्साहाने कार्यरत राहाल. मित्रमैत्रिणी भेटतील.
कन्या - कर्मचाऱ्यांचे सहकार्य. प्रवासामध्ये काळजी हवी. अतिरिक्त श्रम करावे लागतील.
तूळ - मुलामुलींची प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
वृश्चिक - मानसिक प्रसन्नता लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
धनू - आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. सुसंधीचे व प्रसद्धीचे योग संभवतात.
मकर - मनोबल उत्तम राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक. वैवाहिक सौख्य लाभेल.
कुंभ - आनंदी व आशावादी राहाल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे विनासायास पार पडतील.
मीन - महत्त्वाच्या कामात अडचणी जाणवतील. प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत.
- प्रा. रमणलाल शहा
-
Posted: October 5th, 2008, 12:00am CDT
साप्ताहिक भविष्य - श्रीराम भट
-
Posted: September 29th, 2008, 12:00am CDT
मेष - कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्च वाढणार आहेत. मानसिक अस्वस्थता राहील.
वृषभ - आर्थिक लाभ समाधानकारक राहील. काहींना विविध लाभ होतील. जिद्द वाढेल.
मिथुन - मानसिक प्रसन्नता लाभेल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
कर्क - आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक. खर्च वाढणार आहेत. नातेवाइकांचे सहकार्य.
सिंह - प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कन्या - मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामे यशस्वी होतील. प्रवास सुखकर होतील.
तूळ - खर्च वाढणार आहेत. अस्वस्थता राहील. महत्त्वाची कामे शक्यता पुढे ढकलावीत.
वृश्चिक - मनोबल उत्तम राहील. काहींना विविध लाभ होतील. प्रवास शक्यतो टाळावेत.
धनू - सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान वाढेल. वाहने चालवताना दक्षता घ्यावी. इतरांवर प्रभाव राहील.
मकर - कार्यक्षेत्र वाढेल. जिद्द व चिकाटी वाढणार आहे. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
कुंभ - आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक. मानसिक अस्वस्थता. प्रवास पुढे ढकलावा.
मीन - वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. उत्साहवर्धक घटना घडेल.
- प्रा. रमणलाल शहा
-
Posted: September 28th, 2008, 12:00am CDT
साप्ताहीक भविष्य - श्रीराम भट
-
Posted: September 27th, 2008, 12:00am CDT
मेष - मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्याकडे लक्ष द्यावे. सहकार्याची अपेक्षा नको.
वृषभ - गुंतवणुकीची कामे टाळावीत. मानसिक अस्वस्थता राहील. कामात लक्ष लागणार नाही.
मिथुन - जिद्द व चिकाटी वाढेल. प्रवासाचे योग येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला सुसंधी लाभेल.
कर्क - प्रवासाचे योग येतील. काहींना आर्थिक लाभ संभवतात. आर्थिक धाडस टाळावे.
सिंह - आरोग्याकडे लक्ष द्यावे. मनोबल कमी राहील. साडेसातीची तीव्रता जाणवेल.
कन्या - अतिरिक्त खर्च संभवतात. जादा श्रम करावे लागतील. मनोबल कमी राहील.
तूळ - मित्रांशी मतभेद संभवतात. महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत.
वृश्चिक - आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज. प्रवास टाळावेत. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक.
धनू - काहींना एखादा मनस्ताप संभवतो. कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर - मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत. महत्त्वाची कामे नकोत.
कुंभ - आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एखादा मनस्ताप संभवतो. प्रवासामध्ये काळजी हवी.
मीन - मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास टाळावेत. हितशत्रूंवर मात कराल.
- प्रा. रमणलाल शहा
-
Fetched: September 7th, 2008, 1:12pm CDT
पूर्वापार शिव, शक्ती, गणेश आणि सूर्य ही आधिदैवत मानण्यात आली आहेत. शिव हे आकाश, शक्ती ही चेतना, श्री गणेश हे शब्दब्रह्म आणि सूर्य हा प्रकाशरूपातील साक्षी असे हे आधिदैवतांचे साम्राज्य आहे. श्री गणेश हे शिव, शक्ती आणि सूर्य यांचे एक सर्वसमावेशक रूप आहे. .......
-
Posted: August 17th, 2008, 12:00am CDT
कबीर म्हणतो ः साधु कहावन कठिन है, लम्बा पेड खजूर।
चढै तो चाखै प्रेम रस, गिरै तो चकना चूर।।
अर्थ - साधू किंवा गुरू म्हणवून घेणे फार कठीण आहे. खजुराचे झाड फार उंच असते. त्याच्या टोकापर्यंत गेल्यावरच प्रेमरस मिळतो; परंतु त्या टोकापर्यंत जाणे फार अवघड आहे. नाही तर खाली पडून हाडे मोडण्यास वेळ लागत नाही. .......
-
Posted: August 10th, 2008, 12:00am CDT
कुंभ राशीत धनिष्ठा नक्षत्रात तृतीय चरणावर १६ ऑगस्ट २००८च्या उत्तररात्री चंद्रग्रहण होत आहे. हे चंद्रग्रहण रवी-नेपच्यून, प्रतियुतीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. २६ जानेवारी २००९च्या प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी मकर राशीत खंडग्रास सूर्यग्रहण होत आहे. ........
-
Fetched: August 5th, 2008, 2:27pm CDT
नेपच्यून हा तीव्र मानसिक संवेदना असलेला ग्रह आहे. त्याची एक टेलिपथी असते. प्रेम, प्रणय, आणि प्रीती या संदर्भातून त्याचा अँटिना अतिशय ग्रहणशील (Receptive) असतो. त्यामुळेच तरुणतरुणींच्या मनावर तो खूप अंमल करतो. सध्याचा वक्री नेपच्यून अनेक भावनिक ग्रहांच्या प्रतियुतीतून पुढील काळात जाणार आहे. त्यामुळेच आगामी काळात तो विवाहाचे स्टॉक एक्स्चेंज पूर्णपणे ढवळून काढणार आहे. .......
-
Posted: July 27th, 2008, 12:00am CDT
ता. १ ऑगस्ट २००८ च्या शुक्रवारी कर्क राशीत पुष्य नक्षत्रात खग्रास सूर्यग्रहण होत आहे. अर्थात राहू मकर राशीत आलेलाच आहे. कर्क आणि मकर या समोरासमोरील राशी आहेत. या राशींचे नेहमी एक बचावात्मक धोरण असते. या राशी जरी मोकळ्या वागल्यासारखे दाखवत असल्या, तरी त्या आपला भावनिक कोष जपत असतात. ........
-
Posted: July 20th, 2008, 12:00am CDT
१९७७ वर्ष जाऊन तीस वर्षे लोटली. भारतीय राजकारणाला एक वेगळा संदर्भ देणारे ते वर्ष होते. भारताच्या स्वातंत्र्यकुंडलीत कर्क राशीत ग्रहांचा एक गोलयोग झाला आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा कर्क राशीत रवी, चंद्र, बुध, शनी, प्लुटो हे सर्व ग्रह होते. विशेष म्हणजे रवी-शनी या ग्रहांना घेऊन आश्लेषा नक्षत्रात चतुर्ग्रही झाली आहे. .......
-
Posted: July 13th, 2008, 12:00am CDT
पौर्णिमेचा एक उन्मेष असतो. पौर्णिमा हे सृष्टिक्रमातील एक अद्भुत ग्रहसंधान होय. पौर्णिमा ही अध्यात्मशास्त्रातील चिद्विलासाशीच संबंधित आहे. त्यामुळेच दत्तसंप्रदायात किंवा भागवत संप्रदायात तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. .......
-
Fetched: July 7th, 2008, 3:51pm CDT
अंडरवर्ल्ड हा शब्द गुन्हेगारी जगतासाठी वापरला जातो; परंतु ग्रहांचेही अंडरवर्ल्ड असते. सप्ताहात दि. ९ जुलै ०८ रोजी रवी-गुरू प्रतियुती होत आहे. लगेचच दि. १० जुलै २००८ रोजी शनी-मंगळ युती होत आहे. आगामी दोन वर्षांच्या कालावधीत शनी आणि मंगळ या ग्रहांचे हर्षलशी मोठे कुयोग होत आहेत. एकंदरीत आगामी दोन वर्षांच्या कालावधीत ग्रहांचे अंडरवर्ल्ड चांगलेच जागृत होणार आहे. ........
-
Posted: June 29th, 2008, 12:00am CDT
ता. १ जुलै २००८ रोजी मंगळवारी "मंगळ' मघा नक्षत्रातील रेग्युलस या प्रथम दर्जाच्या ताऱ्याजवळ येत आहे. ग्रहताऱ्यांचा एक स्वरमिलाप किंवा स्वरसंवाद असतो, यालाच PLANETARY HORMONY म्हणतात. प्रत्येक व्यक्ती अशीच एक प्लॅनेटरी हार्मोनी घेऊन जन्माला आलेली असते आणि ही स्वरसंगती कायमची स्थिर असते. .......
-
Posted: June 22nd, 2008, 12:00am CDT
"नेपच्यून' हा ग्रह हिमनगासारखाच आहे. हिमनगाचा एक अष्टमांश भाग फक्त पाण्याच्या वर असतो. नेपच्यूनची वृत्ती फुलपाखरासारखी नाजूक आणि भावनिक आहे. फुलपाखराला हात लावल्यावर ते निस्तेज होते आणि अर्थातच कोमेजते. नेपच्यूनमध्ये स्त्रीत्व आहे. चंद्र आणि शुक्र ग्रहांचे उत्कट भावनिक मिश्रण या ग्रहांमध्ये पाहावयास मिळते. ........
-
Posted: June 15th, 2008, 12:00am CDT
ता. १८ जून २००८ रोजी धनू राशीत मूळ नक्षत्रात वटपौर्णिमा आहे. गुरू धनू राशीत असताना होणारी अशी ही पौर्णिमा आता परत बारा वर्षांनी होईल. मूळ नक्षत्राचा आणि वटपौर्णिमेचा फार जवळचा संबंध आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत वृक्षांना देवस्वरूप मानतात. निसर्गाविषयीच्या केलेल्या खोलवर चिंतनातून आपली संस्कृती फुलली. नद्या, वृक्ष, गोमाता, भूमी यांचे पूजन करणाऱ्या आपल्या संस्कृतीने नित्य स्मरणात त्यांना स्थान दिले. .......
-
Fetched: June 7th, 2008, 3:48pm CDT
पृथ्वी हा एक भावयुक्त ग्रहगोल आहे. कारण त्यावर मानवी मन क्रीडा करते. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, त्यावर जीवजंतूंची, तसेच पशुपक्ष्यांची चेतना किंवा जाणीव वास करते. पशुपक्ष्यांची चेतना त्यांच्यात बुद्धिभेद नसल्याने निसर्गाशी तादात्म्य पावली आहे. त्यामुळेच निसर्गातले आणि अवकाशातील बदल त्यांना चटकन जाणवतात आणि त्यांचा अर्थ त्यांच्यातील जाणिवेत उतरतो. .......
-
Fetched: May 31st, 2008, 5:47pm CDT
ता. ३ जून रोजी शनैश्चर जयंती आहे. अर्थातच या दिवशी वैशाखी अमावस्या आहे. जातकशास्त्रातील कथेनुसार शनीचा जन्म पौष शुक्ल अष्टमीस रेवती नक्षत्रावर झाला, असे सांगण्यात येते. मात्र शनैश्वर जयंती वैशाखी अमावस्येला साजरी करण्याची परंपरा आहे. या अमावस्येच्या दिवशी बहुतांश वेळेला कृत्तिका नक्षत्र असते. अमावस्येचा आणि शनीचा संबंध अतिशय जवळचा आहे. एक तर अमावस्येला चंद्रबल नसते, शिवाय अंधाराशी किंवा सूर्यास्ताशी शनीचा फार जवळचा संबंध आहे. आम्ही तर असे म्हणतो, की ज्यांचा अमावस्येचा जन्म आहे त्यांच्या पत्रिकेत जणू दोन शनिग्रह क्रियाशील असतात. एक मूळ शनी आणि दुसरा "अमावस्या' हा एक शनी. .......
-
Posted: May 25th, 2008, 12:00am CDT
नियती फक्त प्रतिक्रिया व्यक्त करत असते आणि ही प्रतिक्रिया घडून येण्यासाठी स्थळ, काळ, परिस्थिती आणि त्या अनुरूप जिवंत माणसे हे सर्व घटक जुळून यावे लागतात आणि मग ती गोष्ट "गोष्ट जन्मांतरीची' होत असते. नियती चांगले-वाईट जाणत नसते. चांगल्या-वाईटाचे परीक्षण माणसे करत असतात. नाहीतर तिरुपती किंवा शिर्डीला जाताना भीषण अपघात झालेच नसते. वसंत कानेटकर काय किंवा विजय तेंडुलकर काय हे एक मनस्वी प्रतिभावंत होते. नियतीची गणिते ते जाणत होते. काही विशिष्ट बाबतींत नियतीचा अंकुश असतोच असतो. जीवनाकडे एकांगी अंगाने पाहूच नका. असे विजय तेंडुलकर म्हणत असत. माणसाची परिस्थिती बलवान ठरत असते. या परिस्थितीतून गरुडाप्रमाणेच काही गिधाडेही जन्म घेत असतात आणि त्यातून नियतीचे एक वेगळे तांडव पाहायला मिळते. माणूस, समाज आणि परिस्थिती परस्पर संबंधितच आहेत. यांचे मूळ शोधता शोधता काही भयंकर गोष्टी लक्षात येतात आणि नियतीचा अंकुश जाणवतोच. विजय तेंडुलकरांची पत्रिका अतिशय अभ्यसनीय आहे. मिथुन रास आणि मिथुन लग्न असलेले तेंडुलकर पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात जन्मले. त्यांच्या पत्रिकेतील मीन राशीतील गुरू-हर्षल युतीमुळे नियतीच्या शरसंधानाचे नटनाट्य तेंडुलकरांनी उत्तम रंगवले आणि एक "निशांत' साजरा केला किंवा सादर केला. .......
-
Posted: May 18th, 2008, 12:00am CDT
सध्या "हर्षल' कुंभ राशीतून पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रातून जात आहे. या नक्षत्रातील "मिथुन नवांशात मारकॅब नावाचा मनस्वी गुणधर्म असलेला एक स्थिर तारा आहे. अफाट बुद्धिमत्तेशी संबंधित असलेला हा तारा स्किझोफ्रेनिया या मानसिक रोगाशीही संबंधित आहे. आगामी काळात हर्षल या ताऱ्याजवळ राहणार आहे. शिवाय शनीशी त्याचा प्रतियोग होणार आहे. गुढतेशी हर्षल या ग्रहाचा संबंध आहेच. आगामी काळात माणसांच्या अतींद्रिय शक्ती जागृत होणार आहेत. अफाट मानसिक आणि बौद्धिक शक्ती असलेली जशी माणसे पाहण्यात येतील; तसेच बुद्धिमान मनोरुग्णांचेही प्रमाण वाढणार आहे. हा असमतोल म्हणजेच हर्षलियन युगाची नांदी होय. ज्योतिषशास्त्र हे खरे पाहता मानसशास्त्र आहे. आद्य खगोलशास्त्रज्ञांनी आणि निष्णात मानसशास्त्रज्ञांनी ज्योतिषशास्त्राबद्दल बोलके मौन पाळले आहे. वैश्विक मनावर अंमल करणारे हर्षल, नेपच्यून आणि प्ल्युटो हे ग्रह शनी या ग्रहाच्या पलीकडचे आहेत. जडवस्तू पलीकडील अणुविज्ञानाशी ते खेळतात. हे ग्रह ेलींर्रींश (मनाच्या उच्च स्तराशी संबंधित) आहेत. योगवासिष्ठातील चिद्अणू संकल्पना ते सिद्ध करतात. ज्ञानेश्वर म्हणतात-
"घन अज्ञान सुषुप्ती। तो बीजांकुरभावो म्हणती। येर स्वप्न ह न जागृती। हा फळभावो तिथेचा।।'
चिद्अणू हा एक बीजांकुर भाव आहे. त्याचा स्पंद म्हणजे स्वप्न आणि जागृती होय. हा स्पंद ज्योतिषशास्त्राचे मानसशास्त्र जाणून घेऊ शकते. शेक्सपिअरला हा ज्योतिषशास्त्राचा स्पंद जाणवला होता! ......
-
Posted: May 11th, 2008, 12:00am CDT
My goal is simple. It is a complete understanding of the universe, why it is us it is and why it exists at all. ........
- स्टीफन हॉकिंग्ज
-
Fetched: May 3rd, 2008, 6:57pm CDT
"सरकार राज' गीता कलियुगाची!
मुझे जो सही लगता है, वही मै करता हूँ।
वो चाहे भगवान के खिलाफ हो, समाजके
खिलाफ हो, पुलिस, कानून या फिर पुलिस
सिस्टिमके खिलाफही क्यूं न हो। .......
-
Posted: April 27th, 2008, 12:00am CDT
(श्रीराम भट)
दि. ३ मे २००८ रोजीच्या शनिप्रदोषाच्या दिवशी शनी सिंह राशीत मार्गी होत आहे. त्यामुळेच त्या आधी तो स्तंभी राहील. सध्या शनी आपल्या वडिलांच्या म्हणजे सिंह राशीत आहे. शनीला वेगळ्या अर्थाने रविपुत्र म्हणतात. रवी हा प्रकाश आहे आणि गतिरूप असलेली आपली ग्रहमाला आहे. .......
-
Posted: April 27th, 2008, 12:00am CDT
काहींवर स्तंभी शनीची छाया...
-
Posted: April 20th, 2008, 12:00am CDT
(श्रीराम भट)
चीन या देशाविषयी जगात नेहमी कुतूहलाची भावना असते. जगातील अवाढव्य लोकसंख्येचा आणि अवाढव्य भूखंड असलेला हा देश क्रांतीच्या वणव्यातून पुनर्जीवित झाला. १ ऑक्टोबर १९४९ रोजी दुपारी ३ वाजून १ मिनिटांनी बीजिंग येथे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना अस्तित्वात आला. सायन कुंभ लग्न आणि सायन कुंभ रास असलेला हा चीन एक अस्सल शनिप्रधान देश आहे. ......
-
Posted: April 20th, 2008, 12:00am CDT
वर्गोत्तम मंगळ शुक्राची रंगतदार फायनल!
-
Posted: April 13th, 2008, 12:00am CDT
"हनुमान' हा रामायणातील एक अद्भुत कथाविषय आहे. हनुमानाशिवाय रामायण पूर्ण होत नाही. जसे श्रीकृष्णाशिवाय महाभारत. हनुमानाच्या जन्मकथा अनेक आहेत. पण एक मात्र निश्चित, की हनुमानाचा जन्म "स्वाती' नक्षत्रावर झाला. "स्वाती' हे ब्रह्महृदय आहे. "स्वाती' हे अस्सल वायुतत्त्वाचे नक्षत्र आहे. "स्वाती' हे निरपेक्ष प्रेमाचे एक प्रतीक आहे. .......
-
Posted: March 30th, 2008, 12:00am CDT
(श्रीराम भट)
६ एप्रिल २००८ रोजी सर्वधारी नाम संवत्सर सुरू होत आहे. आणि वसंत ऋतूचे आगमन होईल. हे आगमन रेवती नक्षत्रावर होत असते. रेवती हे निखालस विवाह नक्षत्र आहे. रेवती आकाशातून भ्रष्ट होऊन सरोवराच्या रूपात पृथ्वीवर राहिली. येथेच तिला कन्या संतती झाली आणि या कन्येचे एका सिद्ध मुनीने लग्न लावून (तेसुद्धा रेवती नक्षत्रावर) तिला शापमुक्त केले. वसंतागमन बहुतांशी शुक्र त्याच्या उच्च राशीत म्हणजे मीन राशीत असतानाच होते. असे हे सृष्टीचे कालचक्र अद्भुत आहे. आता ध्रुव प्रदेशात पशु-पक्ष्यांना वसंतागमनाचे कौतुक राहिले आहे. आणि सृष्टीतील हे मिलनाचे संकेत तेच जाणतात. आणि मनुष्य मात्र प्रेमात पडण्यासाठी किंवा विवाहासाठी मुहूर्त बघतो. किती माणूस मूर्ख व्यावहारिक आहे नाही का? ........
-
Posted: March 23rd, 2008, 12:00am CDT
(श्रीराम भट)
प्रत्येक ग्रहाची एक मानसिकता असते आणि त्या मानसिकतेला अनुसरून त्यांचे काही Key words (शब्दावली) असतात. Confusion (गोंधळ), Chaose (अनवस्था), Dreamy (स्वप्नाळू), Elusive (संमोहनातून फसणे), Fake (बनावट), ते latile (चांचल्य, अस्थिरता) अशी ही नेपच्यूनची शब्दावली शेअर बाजाराला सध्या जबरदस्त लागू पडत आहे. .......
-
Posted: March 23rd, 2008, 12:00am CDT
बुध-शुक्र-हर्षल त्रिग्रहयोगाचे सप्तरंग!
-
Posted: March 16th, 2008, 12:00am CDT
मृत्यूचे तत्त्वज्ञान
तेषामहं समुद्धता मृत्युसंसारसागरात्।
भवामि नचिराल्पार्थ मय्यावेशितचेतसाम्।।
(हे अर्जुना, त्या माझ्या ठिकाणी चित्त लावणाऱ्या प्रेमी भक्तांचा मी लवकरच मृल्यरूप संसार समुद्रातून उद्धारकर्ता होतो.)
सध्या प्लुटो मूळ नक्षत्रातून भ्रमण करत आहे. आगामी दशकात तो मूळ नक्षत्रातच राहील. काही नक्षत्रांवर पूर्वी देवांच्या काही उद्घोषणा झाल्या आहेत, तशीच काही पुण्यकृत्येही झाली आहेत. त्यावरून त्या नक्षत्रांचे स्वभाव ठरले. मूळ नक्षत्र असेच आहे, की त्यावर देवांनी ""आम्ही असुरांचे मूळच उच्छेदून टाकू'' अशी घोषणा केली. त्यामुळेच मूळ नक्षत्राचा संबंध मृत्यूच्या तत्त्वज्ञानाशी येतो. मृत्यूचे भयाण तांडव बघून श्रीकृष्णाने महाभारताच्या शेवटी कलियुगाची पहाट होत असल्याची सूचकता दर्शवली. आता माणसांना भीषण मृत्यू, खून, अपघात व भीषण मानवी छळाची जणू सवयच झाली आणि हा मृत्युसंसार अधिकाधिक भीषण होत चाललाय.
श्रीराम भट
-
Posted: February 24th, 2008, 12:00am CST
धोनीची बोली!
'Try not to become a man of success but rather to become a man of value' असे अल्बर्ट आईनस्टाईन म्हणाले होते. सध्या या वाक्याची आठवण झाली, की हा एक मोठा कल्पनाविलास वाटतो.
-
Posted: November 18th, 2007, 12:00am CST
-
Posted: July 29th, 2007, 12:00am CDT
शनि आणि मंगळ हे ग्रह म्हणजे जणू महासत्ता होत. त्यांच्यामध्ये बऱ्याचदा ग्रहयुद्धच होत असते. या सप्ताहात २९ जुलै २००७ रोजी मंगळ वृषभ राशीत प्रवेश करत आहे. ३१ जुलै २००७ रोजी मघा आणि कृत्तिका या जहाल नक्षत्रांमधून शनि-मंगळ केंद्रयोग होत आहे. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात होणारा हा कुयोग काही नक्षत्रांना तीव्रतेने प्रतिकूल फळे देईल. ३० जुलै २००७ च्या सोमवारी सूर्योदयीच मकर राशीतील श्रवण नक्षत्रातील प्रीतियोगावरील पौर्णिमा शुक्र वक्री असताना आणि रवी-गुरू त्रिकोण योगात असताना होत आहे. काही नक्षत्रांना ती हमखास विवाहयोग आणेल. गुरु वृश्चिक राशीत वर्गोत्तम असताना होणारी ही गुरुपौर्णिमा काहींना आध्यात्मिक वैभव देणारीच आहे. ........
-
Posted: July 15th, 2007, 12:00am CDT
(श्रीराम भट)
सप्ताहात १६ तारखेला पहाटे शनी सिंह राशीत प्रवेश करीत आहे. मिथुन राशीची साडेसातीतून मुक्तता होऊन कन्या राशीला साडेसाती सुरू होत आहे. सिंह राशीतील शनी उच्चपदस्थांना जास्त प्रतिकूल असतो. शनी सिंह राशीत आल्यानंतर चंद्राशी पिधानयोग करत आहे. त्यामुळेच तो आगमनातच काही राशी नक्षत्र गटांना आपले लक्षण दाखवून देईल. १७ जुलै रोजी सिंहेत मघा नक्षत्रातील रेग्युलस या महान ताऱ्याच्या प्रभावक्षेत्रात चंद्र-शुक्र युती होत आहे. ही युती मेष, वृषभ, मिथुन, वृश्चिक राशींना काही खास फळे देण्यास समर्थ आहे.
-
Posted: July 1st, 2007, 12:00am CDT
आज ता. १ जुलै २००७ रोजी शनी-शुक्र युती कर्क राशीत आश्लेषा नक्षत्रात होत आहे. त्यानंतर लगेचच ता. ३ जुलै २००७ रोजी शुक्राचा सिंह राशीत प्रवेश होईल. सामान्यत- रवीच्या पुढील राशीत शुक्रभ्रमण स्वतंत्ररीत्या फळे देत असते. असे म्हणतात, की सिंह राशीत एखादा तरी ग्रह असावा. कारण माणसाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असावेच. सध्या मेष राशीत मंगळ असताना होणारे हे सिंह राशीतील शुक्राचे भ्रमण अनेकांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व फुलवेल.
-
Posted: June 24th, 2007, 12:00am CDT
या पौर्णिमेच्या सप्ताहात मिथुन राशीत रवी-बुध सहयोग राहणार आहे. शिवाय कर्क या स्त्रीराशीतील शुक्रभ्रमण नेपच्यूनच्या प्रतियोगातून होत आहे. पौर्णिमेजवळ चंद्राच्या राशीतील शुक्रभ्रमण काही नक्षत्र गटांना आध्यात्मिक भावदृष्टी देणार आहे. त्याचबरोबर सध्याचे आश्लेषा नक्षत्रातील शनिभ्रमण नेपच्यूनच्या प्रतियोगातून जीवनातील मृगजळाचा अनुभव देईल.
-
Posted: June 10th, 2007, 12:00am CDT
अमावास्या-पौर्णिमा ग्रहांचा ट्रॅक बदलत असतात. बऱ्याच वेळेस अमावास्या-पौर्णिमेजवळ होणारी राश्यांतरे वा वक्री ग्रह बलवान होत असतात. अशीच ही अधिक मासातील अमावास्या आहे. विशेष म्हणजे १५ जून २००७ रोजी होणारी अमावास्या शुक्रवारी शुक्राच्याच राशीत (वृषभेत) मृग नक्षत्रात होत आहे. याचवेळी शुक्र चंद्राच्या कर्क राशीत राहून अमावास्येचे शुभत्व वाढविणार आहे. वक्री गुरू असताना गुरुवारी दर्श अमावास्या आहे. हा "गुरू' अर्थातच अमावास्येजवळ शुभ ग्रहांची "लॉबी' अतिशय क्रियाशील करेल.
-
Posted: April 29th, 2007, 12:00am CDT
२९ एप्रिल २००७ ते ५ मे २००७ - रा. का. बर्वे