-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
रविवार पेठ
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. १३ - मिळकतकरामध्ये वाढ करण्यास पालकमंत्र्यांनी अनुकूलता दर्शविली असतानाच कॉंग्रेसने मात्र आपला विरोध कायम ठेवला आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. १३ - इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा सदस्य हुसेन शब्बीर मोइद्दीन गंगावली याने पुण्यात येऊन जिहादी व्याख्याने दिल्याचे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. १३ - ""वन अधिकार कायद्यातून आदिवासींना मिळणाऱ्या हक्कांबाबत संघटनांमध्ये मतभेद असूनही पर्यावरण रक्षण हाच त्यांचा प्रमुख उद्देश आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
हडपसर, ता. १३ - पिंगळे वस्ती ते मुंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाची मुदत संपत आली आहे; मात्र अजूनही हा रस्ता पूर्ण झालेला नाही.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. १३ - दादासाहेब फाळके यांनी पहिला भारतीय चित्रपट कसा बनवला, याची कथा "हरिश्चंद्राची फॅक्टरी' या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी मंगळवारी सांगितले.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. १३ - पुणे शहराचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी (ता. १५) व शुक्रवारी (ता. १६) एक वेळ बंद राहणार आहे. गुरुवारी सकाळी एलएलआर व एमएलआर या झोनमध्ये, तर त्याच दिवशी सायंकाळी एलएलआर व एसएनडीटी या झोनमध्ये पाणीपुरवठा होणार आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. १३ - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार येत्या २६ ते २८ जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यात ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
पिंपरी, ता. १३ - हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनी व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांमुळे दोन वर्षांत पुन्हा कर्जबाजारी झाली असून, कंपनीतील उत्पादनापेक्षा "आऊटसोर्सिंग'च्या माध्यमातून खासगी उद्योगांना प्रोत्साहित करण्याचा गैरप्रकार सुरू आहे, असा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
पिंपरी, ता. १३ - प्रवाशांसाठी तिकीट दरकपात, ई-तिकीट वितरण व्यवस्था, कामगारांसाठी गणवेश खरेदी या प्रस्तावांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. १४) होणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बैठकीकडे लक्ष लागले आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. १३ - मुख्यमंत्री अशोक चव्हाण गुरुवारी पुण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच पुणे दौऱ्यावर येत आहेत.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. १३ - मासेमारीप्रमाणेच कात्रज तलावामध्ये नौकाविहार पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने (एमटीडीसी) महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
पिंपरी, ता. १३ - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने संपादित केलेल्या जमिनीचा साडेबारा टक्के परतावा मिळावा; यासाठी आकुर्डी, निगडी, वाल्हेकरवाडीतील शेतकऱ्यांनी प्राधिकरण कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन ५७ व्या दिवशी सुरूच होते.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. १३ - पूना गर्ल्स स्कूल्स स्पोर्टस असोसिएशन (पीजीएसएसए) आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत नू.म.वि. मुलींच्या प्रशालेने आठशेपेक्षा जास्त विद्यार्थिनींच्या मध्यम व कनिष्ठ महाविद्यालयीन गटाच्या रिंग टेनिसमध्ये व आठशेपेक्षा जास्त विद्यार्थिनींच्या मोठ्या गटात थ्रोबॉलमध्ये विजेतेपद संपादिताना तिहेरी मुकुट मिळविला.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
येरवडा, ता. १३ - शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिव्या देण्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी पुण्यातील स्त्री-मुक्ती संघटना व "सम्यक' संस्था पालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये "गाली बंद' (शिवीमुक्त) हा उपक्रम राबवीत आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
पिंपरी, ता. १३ - वीज भारनियमनानंतर सुरू झालेल्या औद्योगिक मंदीमुळे अगोदरच अडचणीत सापडलेल्या उद्योगनगरीचे व्यवहार वाहतूकदारांच्या "बंद'मुळे गेले आठ दिवस ठप्प झाले होते.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
ईसकाळ
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
मुंबई, ता. १३ - राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात लोकसभेच्या २६ जागा मागितल्यामुळे कॉंग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
मुंबई, ता. १३ - वीज उत्पादन ८६० मेगावॅटने वाढल्याने भारनियमन कमी झाल्याचे सांगून ऊर्जामंत्री सुनील तटकरे जनतेची दिशाभूल करीत असून वीजनिर्मिती वाढल्याने नव्हे तर मागणी घटल्याने भारनियमन कमी झाले आहे, असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
मुंबई, ता. १३ - संगणकीकृत रेशनकार्ड योजनेबाबत मोठा गाजावाजा केल्यानंतरही या योजनेखालील रेशनकार्ड वितरित करण्यासाठी राज्य सरकारला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
मुंबई - दादर पूर्व येथील एसटी महामंडळाचे "मुंबई-पुणे एशियाड' बसस्थानकही वाहतूककोंडीच्या घुसमटीत सापडले आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
मुंबई, ता. १३ - न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर हल्ल्यानंतर, तसेच माद्रीदमधील रेल्वे बॉम्बस्फोटानंतर सात आठवड्यांनी तिथे मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन झाले होते.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
ंमुंबई, ता. १३ - एसटी कामगारांचा नवा वेतनकरार सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसारच करावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेतर्फ करण्यात आली आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
मुंबई, ता. १३ - केंद्र सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम राज्य सहकारी बॅंकेकडे जाण्यात काहीही गैर नाही. केंद्राच्या योजनेंतर्गत माफ केलेल्या कर्जाची रक्कम राज्य बॅंकेला द्यायची नाही, तर कुणाला, असा सवाल राज्याचे सहकार सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी केला आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
श्रीगोंदे, ता. १३ - रविवारी (ता. १८) होत असलेल्या श्रीगोंदे पालिकेच्या निवडणुकीसाठी आज (ता. १३) दिवसभर प्रचाराची रणधुमाळी उडाली. प्रत्येक उमेदवार त्याच्या समर्थकांसह शहरात प्रचाराची राळ उडवत होता.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
मुंबई, ता. १३ - दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य सुरक्षा दलाकरिता अद्ययावत शस्त्रे, संदेशवहन यंत्रणा व साधनसामग्री खरेदी करण्यासाठी १६ कोटी सात लाख रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नगर, ता. १३ - महापालिकेतील अपक्ष सदस्यांच्या गटनोंदणीचा तिढा सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आज होणारी सुनावणी २२ जानेवारीपर्यंत लांबणीवर पडली आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नगर, ता. १३ - लोकसभा निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा कॉंग्रेसला मिळाव्यात, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी मुंबईतील बैठकीत श्रेष्ठींकडे केली.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
शिर्डी, ता. १३ - """सबका मालिक एक' हा साईंचा संदेश, जगासमोरील धार्मिक वाद व त्यावरून होणारा हिंसाचार थांबविण्याची प्रेरणा मानवजातीला देईल.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नगर, ता. १३ - ""लोकसभा निवडणूक लढवावी, यासाठी वरिष्ठ नेत्यांचा आग्रह आणि पाच तालुक्यांतील इच्छुक आमदारांनी सहकार्य करण्याची घेतलेली भूमिका लक्षात घेऊन, आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार,'' अशी घोषणा आमदार शिवाजी कर्डिले यांनी करून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
शेवगाव, ता. १३ - ""भवसागर तरून जाण्यासाठी श्रीरामकथेचा आदर्श घ्यावा. अंतिम श्वासापर्यंत रामरसाचे प्राशन करा, सोमरसाच्या वाट्याला जाऊ नका; जीवनाचे सार्थक होईल,'' असे कळकळीचे आवाहन रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांनी येथे केले.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नगर, ता. १२ - जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७३ जणांचे उमेदवारी अर्ज राहिल्याने, तीन पॅनेलमध्ये ही लढत होणार आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नागपूर, ता. १३ - वातानुकूलित गाडीतील अव्यवस्थेमुळे झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाकरिता तक्रारकर्त्या प्रवाशाला पाच हजार द्यावे, असा दंड जिल्हा ग्राहक मंचाने दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक आणि मध्य रेल्वेच्या अतिरिक्त विभागीय व्यवस्थापकाला ठोठावला आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नागपूर, ता. १३ - आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र २५ टक्के आरक्षण द्यावे; अन्यथा आम्ही मायावतींना पाठिंबा देऊ, असा इशारा मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी आमदार विनायकराव मेटे यांनी महालस्थित गांधीगेट येथे आयोजित जनजागरण रथयात्रेत दिला.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नागपूर, ता. ८ - ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून नाना प्रकारच्या क्लृप्त्या लढविल्या जातात. सणासुदीच्या काळात जसा आकर्षक "डिस्काउंट' आणि "सेल'चा भडिमार होतो त्याचप्रमाणे नवीन वर्ष जवळ आले की, कॅलेंडर भेट देण्याचा प्रकार हल्ली खूप वाढला आहे.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नागपूर, ता. १३ - तीन किलो सोने, दोन लाखांची रोकड आणि हिरेजडित दागिने असा लाखोंचा ऐवज लंपास करून, घरमालकासोबतच पोलिसांचीही झोप उडवून देणाऱ्या चोरट्याचा छडा लावण्यात सदर पोलिसांनी यश मिळविले.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नागपूर, ता. १३ - वर्णव्यवस्थेकडून चटके सहन केलेला दलित चित्रकार. परिस्थितीवर मात करीत नावारूपाला येत असताना त्याच्यावर प्रेम करणारी सवर्ण युवती. अचानक त्याच प्रेयसीमुळे अपघाताने त्याला अपंगत्व येते.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नागपूर, ता. १३ - अनेक वर्षांपासून नागपुरात वास्तव्याला असलेल्या बांगलादेशी महिला-पुरुषांना पोलिसांनी आज अटक केली. यामध्ये दोन मुले, तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. त्यांना सायंकाळी कारागृहात पाठविण्यात आले.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
अमरावती, ता. १३ - दर्यापुरात बंडू महाराजाच्या लीला, गणेशनगरात शिक्षकाकडून युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न व विनयभंग; तर आज एका अकरा वर्षीय बालिकेच्या विनयभंगाच्या घटनेने जिल्ह्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नाशिक, ता. १३ - महिंद्र अँड महिंद्र च्या प्रोजेक्ट इंजिनीओचा भाग असलेली सर्वांत दिमाखदार युटिलिटी वेहीकल असा दावा केली जाणारी "झायलो' आज येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात भारतीय बाजारपेठेत दाखल झाली.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नाशिक, ता. १३ - ""आम्ही सध्या सर्व लक्ष "झायलो'वर केंद्रित केले आहे. मात्र, संस्थेचे नवे प्रकल्प व संशोधन सुरूच आहे. त्यासाठी साडेपाचशे कोटीची गुंतवणूक असलेला नवा प्रकल्प उभारण्यात येईल. त्याचा कालावधी निश्चित नाही. मात्र, गुणवत्ता व नावीन्य हवे असेल तर वेळेचे बंधन असत नाही. त्यामुळे अपेक्षित ध्येय गाठल्यावर नवा प्रकल्पही कार्यान्वित होईल,'' असे प्रतिपादन महिंद्र उद्योग समूहाचे उपाध्यक्ष आनंद महिंद्र यांनी आज झालेल्या वार्तालापात केले.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नाशिक, ता. १३ - नव्याने निर्माण झालेली श्रीमंत खासगी विद्यापीठे तसेच महाविद्यालये यांच्या प्रचंड शिक्षण शुल्कामुळे शिक्षण सामान्य माणसांच्या आर्थिक कुवतीबाहेर राहत असून आणि केवळ वरच्या वर्गाच्या गरजाच हेच शिक्षण पूर्ण करते.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नाशिक, ता. १३ - शहर व परिसरातील विविध संस्था, संघटनांतर्फे उद्या (ता. १४) मकरसंक्रांतीनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नाशिक, ता. १३ - युको बॅंकेच्या खेडगाव (दिंडोरी) शाखेतर्फे गुरुवारी (ता. १५) दुपारी दीडला किसानदिन व ग्राहक मेळावा होणार आहे. बॅंकेचे कार्यपालक निदेशक व्ही. के. ढिंगरा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
मनमाड, ता. १३ - गेल्या तीन दिवसांत नाशिकसह राज्यात भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल व इंडियन ऑइल गॅस टॅंकरच्या व्यवस्थापकांनी इस्मा (जीवनावश्यक सेवा कायदा) लागू असताना गेल्या आठवड्यात ऑइल डेपो व गॅस प्लॅंट बंद करून बेकायदेशीररीत्या इंधनटंचाई निर्माण केली.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नाशिक, ता. १३ - पुढे दंगल सुरू आहे, तपासणी सुरू आहे, अशाप्रकारे बतावणी करून लूटमार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या श्रीरामपूर येथील तोतया सीआयडी पिता-पुत्रास जागरूक नागरिकांच्या मदतीने गजाआड करण्यात सोमवारी पोलिसांना यश आले.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
पुणे विद्यापीठ
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. ११ - राज्यातील जिल्हा रुग्णालयांत "रेडिऑलॉजिस्ट'च्या जागा पूर्ण क्षमतेने न भरल्याने तेथील "सिटी स्कॅन' विभाग "मरणासन्न' अवस्थेत आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. ११ - पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मिळकतीच्या करवाढीस अनुकूलता दर्शविली आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. ११ - महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी सन २००९-१० या वर्षाचा पुणे जिल्ह्याचा एकूण ३८३ कोटी ३३ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. ११ - "संगणकाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असलेल्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या संस्थांना सायबर गुन्ह्यापासून धोका पोचू शकतो; त्यापासून संरक्षण करण्यासाठी उपाय योजले पाहिजेत,' असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी येथे व्यक्त केले.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. ११ - चालकाची नजर चुकवून चोरट्याने मोटारीचा मागचा दरवाजा उघडून पावणेतीन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेण्याची घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जंगली महाराज रस्त्यावर घडली.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. ११ - घरफोडीच्या सहा गुन्ह्यांत फरारी असलेल्या एका आरोपीसह दोन जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्यांना ता. १७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. ११ - गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार असल्याचे निरोप देण्याचा नगरसेवकांचा अतिउत्साह रविवारी अंगाशी आला.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. ११ - केवळ कॉंग्रेस पक्षच दहशतवाद्यांच्या विरोधातील लढाई लढू शकतो, यावर जनतेनेच विश्वास दाखविला आहे, असे अखिल भारतीय कॉंग्रेसच्या चिटणीस अलका लांबा यांनी रविवारी सांगितले.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. ११ - प्रतिकार केल्यामुळे चोरट्यांनी चाकू पोटात भोसकून युवकाचा खून करण्याची घटना शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास वारजे येथे टेकडीवर घडली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. ११ - ""माझ्यासाठी तरुण दिग्दर्शकांना अजूनही भूमिका सापडतात, याचा आनंद वाटतो. त्यांच्याबरोबर काम करताना मलाही ताजेतवाने वाटते,'' अशी भावना ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी रविवारी व्यक्त केली.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
शिरवळ, ता. ११ - पुणे- बेंगळूरु महामार्गावर धनगरवाडी (ता. खंडाळा ) गावच्या हद्दीत क्वॉलिस गाडी रस्ता दुभाजकास धडकून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर दोन महिला किरकोळ जखमी झाल्या.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
पुणे, ता. ११ - घरात घुसून युवकाला मारहाण करून, रोख २० हजार रुपये, सोनसाखळी, मोबाईल असा एकूण ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याच्या आरोपावरून वानवडी पोलिसांनी तीन जणांना अटक केली.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
मुंबई, ता. ११ - प्रश्नोत्तरे, फायली, सर्वेक्षणांच्या जंजाळात अडकलेली आणि तिच्या मूळ स्त्रोतापासून लुप्त झालेली मिठी नदी आपण वाचवू शकतो, हे रहस्य मॅगसेसे पुरस्कार विजेते जलबिरादरी प्रकल्पप्रमुख डॉ. राजेंद्रसिंग यांनी आज मिठी नदीच्या परिक्रमेनंतर अगदी साध्या सोप्या पद्धतीने उलगडून दाखविले.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
मुंबई, ता. ११ - वारंवार लागणाऱ्या आगीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने अग्निशमन कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
मुंबई - क्लिन अप मुंबई योजनेसाठी नेमलेले मार्शल सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीविषयी जोरदार आक्षेप घेण्यात आले आहेत.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
मुंबई, ता. ११ - मुंबई-महाराष्ट्रात राहतो तो हिंदुस्थानी. राजकारण्यांनी उगीचच मराठी... मराठी... असा मुद्दा उपस्थित करून राजकारण केले आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
अलिबाग - उरण-अलिबाग तालुक्यातील विकासकामांसाठी आमदार मधुकर ठाकूर यांनी सरकारकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
मुंबई, ता. ११ - गुन्हेगारी आणि फौजदारी खटल्यांच्या वार्तांकनाबाबत प्रसिद्धिमाध्यमांवर टीकेची झोड उठत असताना प्रसिद्धिमाध्यमांवर अंकुश ठेवण्यासाठी न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
खारघर - येथील मुर्बीगाव सेक्टर -१९ मधील भाड्याच्या घरात वास्तव्य करणाऱ्या १४ बांगलादेशींना खारघर पोलिसांनी अटक केली. यात सात पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
निजामपूर - अडीच वर्षे लोटले तरीही माणगाव येथील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला शासनाकडून कायमस्वरूपी कर्मचारी दिलेले नाहीत.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
मुंबई, ता. ११ - बॉलीवूडमध्ये बाजीगर असलेल्या किंग खान याला मागे टाकत अक्षयकुमार "सबसे बडा खिलाडी' ठरला आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
मुंबई - मुंबई व बाहेरगावी जाणाऱ्या खासगी टॅक्सी, बसेस, कॉलिस, सुमो अशा वाहनांच्या गराड्यात दादर मध्य आणि पश्चिम रेल्वेस्थानकाबाहेरचा परिसर घुसमटतो आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
पालघर - आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपातून बोईसर विभागातील एसटीचा वाहक जानू डोकफोटे आणि चालक चंद्रकांत पाटील यांची पुरेशा पुराव्याअभावी पालघर सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
नगर, ता. ११ - राज्य पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) आता विशेष शाखेचा दर्जा देण्यात आला आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
कडेगाव, ता. ११ - महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. येथील मल्लांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठे यश संपादन केले आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
नेवासे फाटा, ता. ११ - नेवासे तालुका मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने "राष्ट्रवादी'चाच आहे. काहीही झाले, तरी मी या मतदारसंघातून निवडणूक लढविणारच, असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
मुंबई, ता. ११ - पनवेल-मुंबई रस्त्याचे कंत्राट देण्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात येत्या दोन दिवसांत आपण उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज सांगितले.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
नांदेड, ता. ११ - राज्य शासनाच्या धोरणानुसार काही अपवाद वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची उभारणी करण्यात येणार आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
राहाता, ता.११ - कष्टाची कामे करायला मजूर मिळत नाहीत. हलक्या कामांच्या मजुरीचे दर वाढले आहेत. वाढीव दराने मजुरी देणे शेतकऱ्यांना परवडत नाही.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
वाई, ता. ११ - प्रशासनाच्या कडक पहाऱ्यात आज मांढरदेव येथील यात्रा उत्साहात व शांततेत पार पडली.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
मुंबई, ता. ११ - मालवाहतूकदारांच्या "चक्का जाम' आंदोलनाची झळ सर्वसामान्यांना बसत असल्याने राज्य सरकारची विनंती मान्य करीत आपण हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा "महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टॅंकर, बस वाहतूक महासंघा'चे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.