-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
कडेगाव, ता. ११ - येथील अभिजित कदम क्रीडानगरीत गेल्या चार दिवसांत पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि दोन कास्य पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
बेळगाव, ता. १० - कर्नाटक सरकार परवानगी देवो अगर न देवो सीमा महामेळावा होणारच, अशी निर्णायक भूमिका रविवारी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आली.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
भिलवडी, ता. ११ - औदुंबर (ता. पलूस) येथील सदानंद साहित्य मंडळातर्फे दिला जाणार सुधांशू स्मृती पुरस्कार पुणे येथील शशी इनामदार यांच्या "कविता प्रेमाची' या कविता संग्रहास जाहीर झाला आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
कोल्हापूर, ता. ११ - महाराष्ट्र केसरीचा मान दुसऱ्यांदा पटकावून चंद्रहार पाटीलने आज करवीरच्या मातीची चुणूक पुन्हा सिद्ध केली.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
सांगली, ता. ११ - "आता काय बोलू. माझ्याकडे शब्दच नाहीत. माझे चाहते, हितचिंतक, प्रशिक्षक या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो, याचे मोठे समाधान आहे', असे मत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. १९७३ नंतर इतिहास घडविणारा चंद्रहार भारावला होता.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
कडोली, ता. ११ - मराठी भाषा जगातील समृद्ध व श्रीमंत भाषा आहे. या भाषेची आठ शतकांची समन्वयशील संत परंपरा आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
सांगली, ता. ११ - केंद्राची ७१ हजार कोटी, राज्याची सहा हजार दोनशे कोटींच्या कर्जमाफीशिवाय गेल्या चार वर्षांत उसावरील मावासह बेदाणा, डाळिंब आदींच्या मदतीसाठी आघाडी सरकारने तीन हजार कोटी रुपयांचे वाटप केले.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
चंदगड, ता. ११ - वर्तुळ आखावे तसा गोल चेहरा, त्याला बदामी आकाराची झालर. टपोरे डोळे आणि अणकुचीदार चोच. राखाडी रंगाच्या पिसामुळे बघताच प्रेमात पडावे, असा पक्षी.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
बिसूर, ता. ११ - उत्पादनांचे नियोजन करून बचत गटांच्या सदस्यांना मार्केटिंगसाठी मदत करणार आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
सावळज, ता. ११ - ग्रामीण भागातील सर्वसामान्य द्राक्ष बागायतदारांच्या बेदाण्याला योग्य व रास्त भाव मिळण्यासाठी येथे "ऑनलाईन बेदाणा विक्री' चा पहिला प्रयोग साकार होत आहे. येथील सिद्धेश्वर भवन च्या सभागृहात या प्रकल्पाचे काम सुरू आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
राधानगरी, ता. ११ - काळम्मावाडी धरण गळती रोखण्यासह "सिमेंट ग्राऊंडिंग' उपाययोजना व मुख्य भिंतीवर नव्याने वीज यंत्रणेसाठीच्या प्रस्तावांना लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
कोल्हापूर, ता. ११ - भांडवली खर्चाची जोखीम न घेताही शेतकऱ्यांना आता फळ, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थांच्या प्रक्रिया उद्योगांत पाऊल ठेवता येणार आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
सांगली, ता. ११ - शालेय स्तरावर रस्ता सुरक्षा दलाची चळवळ अधिक मजबूत करण्याचे आश्वासन गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिले.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
सांगली, ता. ११ - "नव्या सार्वत्रिक शिक्षण व्यवस्थेचा शोध' घेण्यासाठी गेली दोन दिवस येथील नवभारत शिक्षण संस्थेच्या वतीने चर्चासत्र झाले.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
सांगली, ता. ११ - अपंग पुनर्वसन संस्थेच्या अपंग भवनासाठी जागा देण्यात येईल. बेरोजगार अपंगासाठी दारिद्य्ररेषेखालील रेशनकार्ड विनाअट मिळवून देण्यासाठी सक्रिय राहीन, अशी खात्री पणनमंत्री मदन पाटील यांनी आज दिली.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
बेळगाव, ता. ११ - महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येथे आयोजित महामेळाव्याला मुंबईतील वल्लभगड वेबपोर्टल समितीने पाठिंबा दिला आहे.
-
Fetched: January 8th, 2009, 2:58pm CST
कोल्हापूर, ता. ८ - तेल व गॅस कंपन्यांतील संपामुळे भारनियमनात वाढ होण्याची शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र शहरात व ग्रामीण भागात विजेचा वापरच मर्यादित असल्याने याची अंमलबजावणी आज होऊ शकली नाही.
-
Fetched: January 8th, 2009, 2:58pm CST
बेळगाव, ता. ८ - जिल्ह्यातील आठ हजार ट्रक पुन्हा महामार्गावर गती घेण्याच्या तयारीत आहेत. ट्रकमालकही चार दिवसांपासून ब्रेकवर ठेवलेला पाय हटवून रेसवर ठेवण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
-
Fetched: January 8th, 2009, 2:58pm CST
सांगली, ता. ८ - मराठा समाजाला चार ते पाच टक्के आरक्षण मिळेल, असे मत भाजपचे पुणे पदवीधर मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
-
Fetched: January 8th, 2009, 2:58pm CST
कोल्हापूर, ता. ८ - मनोहारी रंकाळ्याच्या काठी दरवर्षी महापालिका रंकाळा महोत्सव भरवते. सहा वर्षांत या महोत्सवावर सर्वसाधारण एक कोटी रुपये खर्च झाले; परंतु महोत्सव साजरा करताना आधी रंकाळ्याच्या प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, तो स्वच्छ व सुंदर करून नंतरच महोत्सव घेण्याची कुवत महापालिकेला काही दाखविता आली नाही.
-
Fetched: January 8th, 2009, 2:58pm CST
बेळगाव, ता. ८ - भारत-अमेरिका संयुक्त लष्करी कवायतीला प्रारंभ झाला असून आज कमांडो प्रशिक्षणाची माहिती देण्यात आली. अमेरिकेच्या मराईन रेजिमेंटचे ७० जवान आणि चार अधिकारी या कवायतीत सहभागी झाले आहेत.
-
Fetched: January 8th, 2009, 2:58pm CST
बेळगाव, ता. ८ - अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी आयोजित १६ जानेवारीच्या महामेळाव्यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली. या वेळी समिती शिष्टमंडळाने शिवसेना नेते रामदास कदम यांचीही भेट घेतली.
-
Fetched: January 8th, 2009, 2:58pm CST
कोल्हापूर, ता. ८ - तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या संपामुळे शहरातील दहा पेट्रोल पंप आणि बारा गॅस एजन्सी बंद पडले आहेत. शहरासह जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने जनतेने त्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप जाधव यांनी केला आहे.
-
Fetched: January 8th, 2009, 2:58pm CST
कोल्हापूर, ता. ८ - अलविदा हो अलविदाऽऽऽ हे शोकगीत गात दाटलेल्या कंठाने पंजे, ताबूतांचे आज पारंपरिक पद्धतीने विसर्जन झाले. ढोल-ताशे, पी ढबाक, हलगी-घुमक्याच्या तालात आणि अबीर-खोबऱ्याच्या उधळणीत रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या.
-
Fetched: January 8th, 2009, 2:58pm CST
आष्टा, ता. ८ - बॅंकेचे कर्ज फिटले नाही म्हणून नैराश्य आल्याने येथील शेतकरी गणेश वसंत गायकवाड (वय ४०) यांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली.
-
Fetched: January 8th, 2009, 2:58pm CST
इचलकरंजी, ता. ८ - ट्रक व टेंपो वाहतूक संघटनेतर्फे सुरू असलेल्या संपामुळे शहरातील वस्त्रोद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-
Fetched: January 8th, 2009, 2:58pm CST
जोतिबा डोंगर, ता. ८ - महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यांतील भाविकांचे आराध्य दैवत श्री जोतिबा. देवाच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांच्या रांगेला उन्हाचे चटके सहन करीत दर्शन घ्यावे लागते. मंदिरात दर्शन मंडपाचा प्रस्ताव कागदावरच राहिल्याने ही शिक्षा भाविकांना भोगावी लागत आहे.
-
Fetched: January 8th, 2009, 2:58pm CST
सांगली, ता. ८ - माजी नगरसेवक संजय बजाज आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खोटी विवरणपत्रे सादर करून लाखो रुपयांचा प्राप्तिकर बुडवल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्याचे समजते.
-
Fetched: January 8th, 2009, 2:58pm CST
अनिल कांबळे - सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. ८ - महापालिकेतील सत्ताधारी विकास आघाडीच्या नेत्यांना जकातीच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्यात यश आले; मात्र नगरसेवकांतील अंतर्गत संघर्ष कायम आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. १६ - शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता उजळाईवाडी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागा संपादन केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप जाधव यांनी आज येथे सांगितले.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. १६ - नव्या वर्षात विवाह नोंदणी करायची असेल तर किमान ९६५ रुपये मोजावे लागतील. कालपरवापर्यंत पन्नास रुपयांचे ९६५ कसे झाले, असा प्रश्न पडेल; मात्र आता एक जानेवारीपासून नोंदणी शुल्कात मोठी वाढ होणार आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. १६ - दोन वेगवेगळ्या जागांची बनावट कागदपत्रे तयार करून मयूर दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी दोन बॅंकांना चुना लावल्याचे स्पष्ट झाले आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. १६ - राज्यातील सर्व पतसंस्थांना केवळ "अ' वर्ग सभासदांशीच व्यवहार करण्याचे बंधन राज्य शासनाने घातले आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. १६ - सुशिक्षित बेकारांच्या घरी अर्थगंगा वाहवी यासाठी ससेपालन व्यवसायाची टूम निघाली. त्यात घरबसल्या पैसे मिळणार म्हटल्यावर काही पांढरपेशी लोकही सहभागी झाले.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. १६ - येथील क्रीडापंढरीचा लौकिक चौमुलखी असला तरी येथे क्रीडाविषयाचे केवळ चारच पीएचडीधारक असल्याची माहिती पुढे आली आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
सांगली, ता. १६ - येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय (सिव्हिल) अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज करण्यात येणार आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
सांगली, ता. १६ - महापालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या बढत्या, ठेकेदारांकडे अडकलेले २५ लाख यावरून आज स्थायी समिती सभेत खडाजंगी चर्चा झाली.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
चिक्कोडी, ता. १६ - तालुक्यातील नाईंग्लज येथे जमिनीच्या वादातून आई व मुलाचा खून करण्यात आला आहे. वालूबाई इरगौडा पाटील (वय ४६) व शशिकांत इरगौडा पाटील (वय २८) अशी खून करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
सांगली, ता. १६ - आयात होणाऱ्या वाईनवर कर्नाटक सरकारने प्रति बाटली तीनशे रुपये शुल्क आकारण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वायनरी उद्योजकांना फटका बसत आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
बेळगाव, ता. १६ - महापालिकेच्या विभागीय कार्यालयांचे कार्य समाधानकारक नसल्याचे कारण दाखवून ती कार्यालये बंद करण्याचा निर्णय नगरसेवकांनी लांबणीवर टाकला असला तरी तेथील अधिकाऱ्यांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न मात्र सुरू झाला आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
बेळगाव, ता. १६ - पिण्याच्या पाण्यावरून उद्भवलेल्या वादाची परिणती होऊन झालेल्या भीषण हत्याकांडातील नऊ आरोपींना फाशी, तर सहा आरोपींनी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
मडिलगे, ता. १६ - आजरा अर्बन बॅंकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी गटाच्या "अण्णा-भाऊ' पॅनेलने बाजी मारली. १७ पैकी १४ जागांच्या निवडणुकीत सर्व जागा या पॅनेलने जिंकल्या.
-
Posted: December 12th, 2008, 12:00am CST
पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावरील अपघातात पाच ठार
-
Posted: December 12th, 2008, 12:00am CST
अपघाताच्या नुकसान भरपाईसाठी साताऱ्यात चार एसटीबसेस जप्त
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. १० - बाजारात तेल ५० रुपये, गहू १६ रुपये किलो असेल, तर ती तेल ४० रुपये, गहू १० रुपये किलोने महिलांना विकत होती.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. १० - महावितरण कंपनीकडून वीज वाचविण्यासाठी कपॅसिटरचा पर्यायी वापर वाढविण्यासाठी नवा आरखडा तयार करण्यात येत आहे.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. १० - गेल्या वर्षी १९ कोटींनी तोट्यात असलेल्या महापालिकेला यंदा तब्बल २५ कोटींची आर्थिक तूट सोसावी लागणार आहे.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. १० - नॅनो सायन्सची ऊर्जा, आरोग्य यासह विविध क्षेत्रांतील उपयोजितेवर आज "नॅनो मटेरिअल अँड ऍप्लिकेशन्स' या आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडणी करण्यात आली.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. १० - शिवाजी विद्यापीठाने आज दक्षिण कोरियातील च्योनाम राष्ट्रीय विद्यापीठाशी परस्पर सामंजस्य-सहकार्याचा करार (एमओयू) करण्यात आला.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
बेळगाव, ता. १० - "छडी लागे छमछम, विद्या येई घमघम' असे म्हटले जात असले तरी ही छडीच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
जयसिंगपूर, ता. १० - येथील एका महाविद्यालयाच्या आवारात आज सकाळी सुमारे दोनशे तरुणांचा समावेश असलेले दोन गट हातात शस्त्रे घेऊन समोरासमोर भिडल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला; मात्र वेळीच पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने तरुणांनी पळ काढला.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
सांगली, ता. १० - येथील गुंड अकबर अत्तार याच्या खून प्रकरणी आज आणखी चौघा संशयितांना अटक केली.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
इस्लामपूर, ता. १० - शहर व परिसरातील ठेवीदारांना साडे आठ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या भारतीय नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचा आज प्रशासक बी. जे. शेळके यांनी पोलिसांच्या उपस्थितीत ताबा घेतला.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
बेळगाव, ता. १० - जागतिक मंदीच्या कचाट्यात सापडलेले उद्योजक आर्थिक अडचणीत आले आहेत, तर कामगारांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
सांगली, ता. १० - येथील पतसंस्थांच्या ठेवीदारांनी आजपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयातच बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. "पैसे घेतल्याशिवाय उठणार नाही', असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यात महिलांची संख्या मोठी आहे.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
इस्लामपूर, ता.१० - इस्लामपूरसारख्या छोट्या शहरात बांगलादेशीय युवकाकडून चाळीस हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
सागंली, ता. २० - मतदार यादीत फोटो असण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आता जोरदार मोहीम उघडली गेली आहे.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
सांगली, ता. १० - पणन आणि महिला, बाल विकास मंत्री मदन पाटील मंत्री झाल्यानंतर उद्या (ता. ११) पहिल्यांदाच सांगली दौऱ्यावर येत असल्याने त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
इचलकरंजी, ता. १० - राज्यातील वस्त्रोद्योग व्यवसायाला केंद्राच्या नव्या पॅकेजचे वेध लागले आहे. या व्यवसायासाठी मोठे पॅकेज देऊन राज्य शासनाने हातभार लावला आहे.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
सांगली, ता. १० - पाच वर्षांत ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनेस निधी देण्याच्या अनेकवेळा घोषणा झाल्या. तीन महिन्यांपूर्वी हजार कोटी टप्प्या-टप्प्याने निधी देण्याचे सांगितले होते.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
पलूस, ता. १० - तालुक्यात पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने पोलिसांचे काम थंडावल्याचे चित्र दृष्टीस येत आहे.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. ९ - जगभर सध्या गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास होत आहे. महाराष्ट्राच्या डोंगराळ भागाचा विचार केला तर जगात सर्वाधिक गुंफा येथे आहेत.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
बेळगाव, ता. १० - व्हिएतनाममध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक युवा बुद्धिबळ चॅंपियनशिप स्पर्धेत सहभागी झालेल्या बेळगावच्या युवा बुद्धिबळपटूला कास्यपदक मिळाल्याचा दावा खोटा असल्याचे उघडकीस आले आहे.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
तासगाव, ता. १० - आर. आर. पाटील यांनी राजीनामा देऊन केवळ आमदार म्हणून पक्षामध्ये राहण्याच्या निर्णयाचे तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकमुखाने स्वागत केले आहे.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
बेळगाव, ता. १० - विजापूर शहरात बाबरी मशीद विध्वंसाचे वादग्रस्त भित्तीपत्रक तयार केल्या प्रकरणी बेळगावच्या संशयित पेंटर सलीम माडीवाले याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर विजापूर पोलिस परत बेळगावात दाखल झाले आहेत.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
उचगाव, ता. १० - नागरी अन्न पुरवठा खात्यातर्फे कर्नाटक व महाराष्ट्र हद्दीवर कर्नाटक सरकारतर्फे चौक्या उभारण्यात आल्या आहेत.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
बंगळूर, ता. १० - कुख्यात गुंड नारायण व त्याच्या तिघा साथीदारांना आज गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
सांगली, ता. १० - राजकारण्यांचा वरदहस्त, पोलिसांची तात्पुरती मलमपट्टी यामुळे जिल्ह्यातील गुंडगिरीत वाढ झाल्याचे अलीकडे घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होत आहे.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
चिकोडी, ता. १० - सर्व शिक्षण अभियानांतर्गत केंद्र व राज्य सरकार शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
सांगली, ता. १० - आमदार मदन पाटील यांना कॉंग्रेस पक्षाने कॅबिनेट मंत्री पदाची संधी देऊन वसंतदादा पाटील यांच्या घराण्याला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था आल्याचे मत उद्योजक युनिकॉनचे विजय भगत यांनी व्यक्त केले.
-
Posted: December 11th, 2008, 12:00am CST
कोल्हापूरामध्ये नसबंदी शस्त्रक्रियेच्या धास्तीने तरुणाचा मृत्यू
-
Posted: December 8th, 2008, 12:00am CST
मंत्रामंडळ विस्तारासंबंधी अशोक चव्हाणांची सोनिया गांधींशी चर्चा
-
Posted: December 8th, 2008, 12:00am CST
शाहरुख "किंग' खान.... नव्हे..."दातुक' शाहरुख खान
-
Posted: December 8th, 2008, 12:00am CST
पाकिस्तानचे पुन्हा घूमजाव,"लष्कर'वर कारवाईसाठी कोणाचाही दबाव नाही
-
Posted: December 8th, 2008, 12:00am CST
काश्मीरमध्ये पीडीपी-नॅशनल कॉन्फरन्समधील चकमकीत एक ठार
-
Posted: December 8th, 2008, 12:00am CST
अतिरेक्यांची नजर आता गोव्यावरही!
-
Posted: December 8th, 2008, 12:00am CST
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचा चौथा टप्पा सुरु
-
Posted: December 7th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. ६ - शिक्षण आणि संस्कृतीमुळेच प्रेमाचा नेमका अर्थ तरुणांना समजेल. प्रेम समजल्यावरच एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या घटना कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले.
-
Posted: December 7th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. ६ - नुकत्याच मुंबईवर झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याचा निषेध म्हणून येत्या नऊ डिसेंबरला होणारी "बकरी ईद' काळी ईद म्हणून साजरी करावी, असे आवाहन मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सरचिटणीस हुसेन जमादार यांनी केले.
-
Posted: December 7th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. ६ - आधुनिक पद्धतीने गुऱ्हाळघरे चालवून चव व दर्जा उत्कृष्ट होण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने गूळ तयार करावा, असे आवाहन येथील विभागीय कृषी संशोधन केंद्र शेंडा पार्कचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. भास्कराव जाधव यांनी येथे केले.
-
Posted: December 7th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. ६ - आजरा शहरात शांतता व सुव्यवस्थेसाठी जिल्हा प्रशासन व पोलिसांकडून घेतलेल्या बैठकीतील आवाहन धुकडावून आज तिसऱ्या दिवशी जमावाने मोर्चा काढला.
-
Posted: December 7th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. ६ - महापालिकेच्या राजकारणात दहा वर्षांत महापौरपदाचे तुकडे पाडण्याचा फॉर्म्युला राज्यात गाजला.
-
Posted: December 7th, 2008, 12:00am CST
बेळगाव, ता. ६ - पक्षाची शिस्त सोडून कार्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शिस्तभंग कारवाई समितीची स्थापना करण्यात येणार असून येत्या १७ डिसेंबरपर्यंत सर्व समित्या कार्यरत करणार आहे.
-
Posted: December 7th, 2008, 12:00am CST
सांगली, ता. ६ - ""वैद्यकीय शिक्षण विभागाने गाय अन् सार्वजनिक आरोग्यने वासरू मारलं'', अशी अवस्था वसंतदादा शासकीय रुग्णालयाची झाली असल्याची संतप्त प्रतिक्रिया आज डॉक्टरांनी व्यक्त केली.
-
Posted: December 7th, 2008, 12:00am CST
बेळगाव, ता. ६ - मुंबईहून बेळगावला येणाऱ्या एका खासगी आराम बसमधून अतिरेकी येत असल्याचा दूरध्वनी बेळगाव पोलिस मुख्यालयाला येतो... पोलिसांची धावपळ सुरू होते... संबंधित गाडीची काकतीजवळ तपासणी होते... आणि सर्वच जण सुटकेचा निःश्वास सोडतात... कारण अतिरेकी असल्याचा संशय असलेले ते लष्करी अधिकारी असल्याचे स्पष्ट होते.
-
Posted: December 7th, 2008, 12:00am CST
सांगली, ता. ६ - महापालिकेने संगणकाद्वारे बांधकाम परवाना देण्यासाठी मागविलेली निविदा उल्हासनगरच्या कंपनीने मॅनेज करण्याचा जोरदार प्रयत्न केला; मात्र अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे हे "मॅनेज' प्रकरण फसले. यासाठी पुण्याच्या कंपनीची निविदा मंजूर केली आहे.
-
Posted: December 7th, 2008, 12:00am CST
इस्लामपूर, ता. ६ - नगरपालिका प्रशासनातील कर्मचारी सभागृहाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल करतात, त्यांनी अचूक माहिती द्यावी, अशी मागणी आज विरोधी गटाच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सभेत केली.
-
Posted: December 7th, 2008, 12:00am CST
बेळगाव, ता. ६ - जुन्या काळातील प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री व येथील मराठा कॉलनीतील रहिवाशी सरस्वती बापूसाहेब काळे (पूर्वाश्रमीच्या तारा रेडकर) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या.
-
Posted: December 7th, 2008, 12:00am CST
बेळगाव, ता. ६ - कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत चर्चवर हल्ले केल्या प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या "दिनदार अंजुमन' या संघटनेच्या ११ आरोपींना आज रात्री उशिरा बेळगावात आणण्यात आले.
-
Posted: December 7th, 2008, 12:00am CST
बेळगाव, ता. ६ - येथील दहशतवादविरोधी गुन्हे पथकाने आणखी एका संशयित सीमी दहशदवाद्याला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
-
Posted: November 4th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर - गांधी मैदान येथे महायज्ञास सोमवारी महालक्ष्मी पूजनाने सुरवात झाली. महालक्ष्मी मूर्तीचे पूजन आचार्य राम कुंडल व इतरांनी केले.
-
Posted: November 4th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. ३ - विश्वशांती यज्ञातील होमहवनला आजपासून प्रारंभ झाला. याच वेळी विरोधकांनीही मोर्चा काढून विरोध कायम ठेवला. दरम्यान, देणग्या गोळा करणाऱ्या पावत्यांचे क्रमांक बनावट आहेत.
-
Posted: November 4th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. ३ - जकातीनंतर उपकर कंपनीने भरावा की पंपधारकांनी, या संभ्रमात पंपधारकांनी पेट्रोलच्या खरेदीवर मर्यादा आणल्या होत्या.
-
Posted: November 4th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. ३ - नाट्यसृष्टीत पडद्यामागे काम करणाऱ्या कलावंत, तंत्रज्ञांसाठी सदनिका उभारून त्यांना हक्काचे घर मिळवून देऊ, अशी बुलंदी आवाजात नाना पाटेकर यांनी एका नाट्यसंमेलनात घोषणा केली...
-
Posted: November 4th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. ३ - मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव एस. एस. तिवडे व कोल्हापूर आगाराचे सचिव डी. ए. गोसावी यांनी आज उपोषणास प्रारंभ केला.
-
Posted: November 4th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. ३ - शिक्षण सेवकपदावर १ नोव्हेंबर २००२ नंतर नियुक्ती झालेल्या आणि १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत नियमित झालेल्यांना सेवानिवृत्तीनंतरचे फायदे देणाऱ्या शासनाच्या २००३ च्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी,
-
Posted: November 4th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. ३ - जवाहरनगर म्हटले की गुंड राहुल चव्हाण व भास्कर टोळीचा संघर्ष. राजेंद्रनगर म्हटले की माजी नगरसेवक खंडू कांबळे व त्या परिसरातील गुंडगिरी. पोलिसांच्या यादीवरील ही माहिती.
-
Posted: November 4th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. ३ - चुकीच्या माहितीच्या आधारे प्राथमिक शिक्षक बॅंकेची बदनामी करणाऱ्या प्रसाद पाटील यांनी व्यासपीठावर येऊन आरोप सिद्ध करावे, असे आव्हान बॅंकेचे अध्यक्ष रवी पाटील यांच्यासह सत्तारूढ गटाच्या दहा संचालकांनी पत्रकाद्वारे दिले आहे.
-
Posted: November 4th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. ३ - जिल्हा परिषदेचे वादग्रस्त प्रभारी समाजकल्याण अधिकारी आर. के. शिंगे यांच्याकडील कार्यभार आज काढून घेतला.
-
Posted: November 4th, 2008, 12:00am CST
कोल्हापूर, ता. ३ - जातपडताळणी दाखल्यासाठी लिपिकाच्या माध्यमातून पाच हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून विशेष लाच समाजकल्याण अधिकारी सुनील नागेश खमितकर (वय ३१, रा. गोकुळनगर, सोलापूर) व लिपिक व संगणक ऑपरेटर सचिन प्रभाकर गायकवाड (३८, रा. आष्टी, जि. बीड) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी अटक केली.